Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत

Continues below advertisement

Sanjay Raut Full PC : केंद्रात चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार अतृप्त आत्मे - संजय राऊत शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. मनसे, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष सुपाऱ्या घेऊन निर्माण झाले आहेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे. मनसेमध्ये अस्वस्थता आहे का? असा सवाल संजय राऊतांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी जोरदार हल्लाबोल करत टीकेचा बाण सोडला.    सुपाऱ्या घेऊन पक्ष निर्माण झालेत - संजय राऊत  जेव्हा पक्ष जागेवर असेल तेव्हाच मनसेमध्ये अस्वस्थता असेल. एकनाथ शिंदे, अजित पवार, राज ठाकरे यांच्या पक्षाला जाण नाही, ओढून ताणून बनवलेले हे पक्ष आहेत. त्यांच्यामध्ये कसली अस्वस्थता असणार , असा टोला संजय राऊतांनी लगावला.    मनसे, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा पक्ष हे सगळे सुपाऱ्या घेऊन निर्माण झालेले पक्ष आहेत. भयातून निर्माण झालेले पक्ष आहेत. शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर हल्ले करा आणि त्यांना कमजोर करा, हे त्यांना काम दिलेले आहे. या तिन्ही पक्षांना यासाठी सुपाऱ्या दिल्या आहेत. या सुपार्‍या त्यांनी यासाठी स्वीकारल्या आहेत,  कारण त्यांना सांगितलं आहे की नाही तर तुम्हाला आम्ही तुरुंगात पाठवू, असेही संजय राऊत म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram