Kozhikode | वैमानिक दीपक साठे यांच्या मृत्यूने शोककळा,मराठमोळ्या जिगरबाज कॅप्टनला एबीपी माझाचा सलाम!

मुंबई : आमच्या मुलाने संकटाच्या काळात ही हिम्मत दाखवत एवढ्या प्रवाशांचे प्राण वाचवले. याचे समाधान वाटते. असं कॅप्टन दीपक साठे यांच्या आई नीला साठे यांनी म्हटलं आहे. म्हणतात देव तारी त्याला कोण मारी. मात्र या घटनेत देवाने कोणाला तारले आणि कोणाला मारले. देवाच्या इच्छेसमोर काय म्हणावे. माझा मुलगा लहानपणापासून हुशार होता. प्रत्येक बाबतीत त्याने गुणवत्ता दाखविली. आज तो गेला, एक आई म्हणून आणखी काय म्हणावे, असं नीला साठे म्हणाल्या. विशेष म्हणजे आज 83 वर्षीय नीला साठे यांचा वाढदिवस आहे. आणि एक दिवस आधी त्यांचा मुलगा गेला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola