Rajasthan Politics | सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी, काँग्रेसची कारवाई
Continues below advertisement
राजस्थानच्या राजकारणातली सर्वात महत्वाची घडामोड आज घडलीय. 19 आमदारांना घेऊन गेल्या दोन दिवसांपासून नाराजीचं प्रदर्शन करणाऱ्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेसनं अखेर कारवाई केलीय. त्यामुळे राजस्थानचं राजकारण आता कुठल्या वळणावर पोहचतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
राजस्थानच्या राजकारणात अखेर पायलटचं क्रॉस लँडिंग झालं आहे. सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजस्थानी नाट्यात अखेर काँग्रेसनं कारवाईचं मोठं पाऊल उचललं. 19 आमदारांना सोबत घेऊन सरकार पाडण्याचं षडयंत्र केल्याच्या आरोपावरुन सचिन पायलट यांची सर्व महत्वाची पदं काढून घेण्यात आली आहेत.
Continues below advertisement
Tags :
Rajasthan Congress Jyotiraditya Sinthiya Rajasthan Politics Sachin Pilot Ashok Gehlot Rajasthan Congress