Russia Ukraine War : Share Market : रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानादेखील शेअर बाजारात मोठी उसळी
Continues below advertisement
Share Market Updates : रशिया-युक्रेन युद्धामुळे गुरुवारी कोसळलेला शेअर बाजार आज शुक्रवारी चांगलाच वधारला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानादेखील आज सेन्सेक्स 876 अंकांनी गॅप अपने उघडला. तर निफ्टीतही 297 अंकांची उसळण दिसून आली. रशिया-युक्रेन युद्धामुळे गुरुवारी सेन्सेक्स 2800 अंकांनी कोसळला होता. तर, निफ्टीमध्ये 842 अंकांची घसरण दिसून आली होती. मात्र, आज शेअर बाजार सावरताना दिसत आहे. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 1190 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी 414 अंकांनी वधारला.
Continues below advertisement