Rukmini Love Letter to Krishna :  रुक्मिणी मातेचं श्रीकृष्णाला जगातलं पहिलं प्रेमपत्र ABP Majha

Rukmini Love Letter to Krishna :  रुक्मिणी मातेचं श्रीकृष्णाला जगातलं पहिलं प्रेमपत्र
आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यात आला असला तरी अवघ्या विश्वातील पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणीमातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं. आणि त्या प्रेमपत्रानंतर देवाचा रुक्मिणीमातेशी विवाह झाला होता. योगायोगानं आज साक्षात देवाच्या विवाहाचा दिवस म्हणजे वसंतपंचमी आहे. आणि आजच व्हॅलेंटाईन डेही असल्यानं देवाच्या अनोख्या प्रेमाची आठवण होते. रुक्मिणीमातेनं लिहिलेले हे प्रेमपत्र देवाचं इतकं लाडकं आहे की, आजही द्वारकेला भगवान श्रीकृष्ण रोज हे पत्र ऐकल्याशिवाय झोपायला जात नाहीत. 
धवल रेशमी पट्टावरती केशरी रंगे लिहिले.. अशापरी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले.. 
या शब्दांमध्ये त्या प्रेमपत्राचं वर्णन मिळतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola