RSS Chief Mohan Bhagwat | 30 वर्षांच्या संघर्षाचं फळ मिळालं, संकल्प पूर्ण झाला : मोहन भागवत

 हा आनंदाचा क्षण आहे, एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला आहे, याचा आनंद आहे. इथं मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावं लागणार आहे. सर्वांना आपलं मानणारा धर्म आपल्याला उभा करायचा आहे. या मंदिराच्या पूर्ण होण्याआधी आपल्याला आपलं मनमंदिर उभं करायचं आहे, असं  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

आज अनेक लोकं इथं येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. आत्मनिर्भर बनण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता होती त्याची सुरुवात आज झाली आहे. या आनंदाच्या क्षणी मी सर्वांचं अभिनंदन करतो, असं मोहन भागवत म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola