ते माझे आई-बाबा आहेत, म्युझियममधील प्राणी नाहीत, मनाई करुनही फोटो काढल्याने मनमोहन सिंगांच्या कन्येकडून तीव्र नाराजी
Continues below advertisement
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Dr. Manmohan Singh प्रकृती अस्वास्थ्यामुळे एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेतेमंडळी एम्समध्ये जाऊन त्यांची भेट घेत आहेत. यातच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय मनमोहन सिंग यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मात्र, यावेळी मनमोहन सिंग यांच्या कन्या दमन सिंग यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते माझे आई-वडील आहेत. प्राणिसंग्रहालयातील दिखावू प्राणी नाहीत, या शब्दांत नाराजी व्यक्त केली.
Continues below advertisement