कच्च्या मालावरील निर्बंध उठवा,सीरमच्या अदर पूनावालांचं अमेरिकी अध्यक्ष जो बायडेनना ट्विटरवर आवाहन
Continues below advertisement
पुणे : देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच देशातील सर्वात मोठी औषधी उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) चे सीईओ, अदार पूनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांना लसीकरणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचे आवाहन केलंय. पूनावाला यांनी ट्वीट करत ही मागणी केली आहे.
Continues below advertisement