Reliance Industries : अंबानींच्या तिन्ही मुलांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नियुक्ती
Reliance Industries : अंबानींच्या तिन्ही मुलांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नियुक्ती
मुकेश आणि नीता अंबानी यांच्या तिन्ही मुलांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला संचालक मंडळानं मंजुरी दिली आहे. सध्या त्यांच्याकडे अकार्यकारी संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र अंबानींच्या पुढच्या पिढीला दिलेली ही पहिली जबाबदारी नाही. कारण जिओची जबाबदारी आकाश अंबानींकडे, रिलायन्स रिटेलची जबाबदारी इशा अंबानींकडे, तर नव ऊर्जा विभागाची जबाबदारी अनंत अंबानी यांना याआधीच देण्यात आली आहे.