BJP Gujarat Victory : भाजपच्या दृष्टीनं रेकॉर्डब्रेक विजय, आकडे नेमकं काय सांगतात ?

गुजरात निवडणुकीत भाजपनं 'अब की बार १५० पार'  हा नारा खरा करून दाखवलाय... पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या होमग्राऊंडवर तब्बल ५६ टक्के मतं घेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवण्यात यश आलंय.. भाजपच्या दृष्टीनं हा रेकॉर्डब्रेक विजय म्हणायला हवा.. कारण गेले २७ वर्षांच्या सत्तेत भाजपला एवढं मोठं यश पहिल्यांदाच मिळालेलं आहे. १५७ विधानसभा क्षेत्रातील  भाजप उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय. विजय निश्चित झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुजरातच्याच काय देशाच्या कानकोपऱ्यात जल्लोष सुरू केला... फटाके फोडून, मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजला केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola