RBI Digital Currency : रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी लॉन्च करण्याच्या तयारीत...
पुढील वर्षी भारत स्वतःची क्रिप्टोकरन्सी आणणार आहे. क्रिप्टोकरन्सीबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी बैठकाही झाल्याची माहिती मिळतेय. क्रिप्टोकरन्सी लॉन्च करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची तयारी पूर्ण झाल्याचीही माहिती रॉयटरने स्थानिक वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिलीय. ही डिजिटल करन्सी व्हर्चुअल असेल. मात्र देशाचे मूळ चलन हे रुपयाच असेल. म्हणजे डिजिटल स्वरुपात हा रुपया असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत सीबीडीसीएसद्वारे सॉफ्ट लॉन्चची शक्यता वर्तवली होती. मात्र, याबाबत निश्चित कालमर्यादा दिलेली नाही.
Tags :
Cryptocurrency Digital Currency India Digital Currency RBI Cryptocurrency RBI Digital Currency