RBI New Rule : आजपासून ऑटो डेबिट पेमेंटसाठी 'अॅडिशनल ऑथेन्टिकेशन फॅक्टर' प्रणालीची अंमलबजावणी
Continues below advertisement
बातमी बँक व्यवहारासंदर्भात आजपासून लागू झालेल्या नवीन नियमाची... आपल्यापैकी बरेच जण ऑटो डेबिटचा विकल्प निवडतात... ग्राहकानं ऑटो डेबिटचा पर्याय निवडला असेल तर आतापर्यंत खात्यातून परस्पर रक्कम वळती व्हायची.. अशा व्यवहारात ग्राहकांचं हित लक्षात घेता, आरबीआयनं ATF प्रणाली अर्थात अॅडिशनल ऑथेन्टिकेसन फॅक्टरची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.. या नव्या नियमानुसार ऑटो डेबिटचा विकल्प निवडलेल्या ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट करण्यापूर्वी, 24 तास आधी बँकांकडून मेसेज येईल. आणि रक्कम जर 5 हजारापेक्षा जास्त असेल तर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP देखील येईल. आणि हा पासवर्ड बँकांना दिल्यानंतरच तुमच्या खात्यातून ऑटो डेबिटचे पैसे वळते होतील..
Continues below advertisement