केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारं वक्तव्य

Continues below advertisement

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज काँग्रेसवर चौफेर टीका केली. मागील सहा वर्षात काँग्रेसने फक्त भाजपच्या धोरणांना विरोध करण्याचे काम केलं आहे लोकांमध्ये जाण्याची सवय नसल्याकारणानं राहुल गांधी हे धडपडून पडलेत, अशी खिल्ली उडवणारं वक्तव्य देखील रावसाहेब दानवे यांनी लातुरात केलं. आज ते लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

मागील सहा वर्षांपासून देशात भाजपचे सरकार आहे. सरकारने वेळोवेळी घेतलेल्या सर्व निर्णयांना फक्त विरोध करणे एवढंच काँग्रेसचा अजेंडा आहे. जनमताअभावी काळ झालेलं तोंड विरोध करुन गोरं होतं का? हे पाहण्यासाठी काँग्रेस विरोध करतोय, अशी खोचक टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram