Ramayan Express : भगव्या रंगाच्या पेहरवाला साधुसंतांचा विरोध ABP Majha
Continues below advertisement
साधूसंतांच्या विरोधानंतर रेल्वेने 'रामायण एक्स्प्रेस'मधील वेटर्सच्या पेहरावात बदल केलाय. रेल्वेमधील सर्विस स्टाफच्या भगव्या पेहरावावर साधूसंतांनी आक्षेप घेतला होता. वेटर्सचा भगवा पोशाख हा हिंदू धर्माचा अपमान आहे, तो बदलला नाही तर 12 डिसेंबरला दिल्लीत ट्रेन रोखण्याचा इशारा साधूसंतांनी दिला होता.यांनंतर रेल्वेने रामायण एक्स्प्रेसमधील स्टाफ कर्मचाऱ्यांचा पोशाख बदललाय. रेल्वेने वेटर्ससाठी गणवेश म्हणून शर्ट, पॅन्ट आणि पारंपारिक टोपी दिलीय. मात्र, वेटर्स भगवी टोपी आणि हातमोजे घालणे सुरू ठेवतील.
Continues below advertisement