Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर रामभक्तांची अयोध्येत रेलचेल

Continues below advertisement

Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनंतर रामभक्तांची अयोध्येत रेलचेल अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाची प्रतीक्षा आज संपली... अयोध्येत राममंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले. हिंदू संस्कृतीनुसार सूर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान आणि चंद्र म्हणजे मन... या तिन्ही देवतांना विनंती करत, अग्नि यज्ञाच्या साक्षीने अखंड मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. प्रभाते मनी राम चिंतीत जावा।, पुढे वैखरी राम आधी वदावा॥ श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकाची खरीखुरी सात्विक प्रचिती सध्या अखंड भारत भूमी घेतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाचं पूजन करण्यात आलं. अखंड भारत सध्या राममय झालाय... संपूर्ण भवतालात, अवकाशात, आणि मनामनात प्रभू श्रीराम विरघळून गेलेत. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दरवळ काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पसरलाय. आणि आनंदाची डोही आनंद तरंग म्हणत संपूर्ण देशभरात रामलहरी पसरल्यायत. प्रभू श्रीराम मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, असा संदेश देत आणि घेत, इथल्या हवा तसेच मातीच्या प्रत्येक कणाकणावर, इथल्या आभाळावर आणि इथल्या प्रत्येक मनामनावर एकच नाव कोरलं गेलंय आणि ते म्हणजे, रघुपती राघव राजाराम.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram