Ram Mandir Ayodhya : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी सजली
Ram Mandir Ayodhya : रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्यानगरी सजली अयोध्येतील रामजन्मंभूमीत प्रभी श्री रामाचे मंदिर निर्माण झाल्यानंतर आज पहिलीच रामनमवी आहे. या पहिल्या रामनमवीच्या दिवशी अयोध्येत मोठ्या संख्येने रामभक्तं दर्शनासाठी दाखल झालेत. अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान गडी आणि राम मंदिर परीसर भाविकांनी फुलून गेलेत. अयोध्येतील ही संभाव्य गर्दी लक्षात घेता अयोध्या शहरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या शहराबाहेरच सर्व वाहने थांबवून सर्व भाविकांना चालतच मंदिरात दर्शनासाठी जावं लागत आहे. तसेच भाविकांची गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. आज राम नमवीच्या दिवशी २५ लाखाहून अधीक भावीक राम मंदिरात रामलल्लाचे दर्शन घेणार असल्याची माहीती प्रशासनाने दिली आहे.