Rajnath Singh Full Speech : बुरखा फाडला, कडक इशाराही दिला..बॉर्डवर जाऊन पाकची इज्जत काढली!
Rajnath Singh Full Speech : बुरखा फाडला, कडक इशाराही दिला..बॉर्डवर जाऊन पाकची इज्जत काढली!
Rajnath Singh on Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर हे केवळ एका मोहिमेचे नाव नसून तो आमचा निर्धार आहे. हा असा निर्धार आहे ज्यात केवळ आम्ही डिफेन्स करत नाही, तर गरज पडल्यावर आम्ही कठोर निर्णय घेतो आणि कठोर कारवाई देखील करतो. दहशतवाद्यांनी आमच्या माथ्यावर वार केला आम्ही त्यांची छाती फोडली. पहलगामच्या भ्याड हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मारलं, त्यात त्यांचा काय दोष होता? त्यावेळी त्यांनी आमचा धर्म विचारून हल्ला केला, म्हणून आम्ही त्यांचे कर्म बघून बदला घेतला. पाकिस्तान अशा दहशतवाद्यांना आश्रय दिला म्हणून आम्ही पाकिस्तानला भारतीय धर्म दाखवून दिला. असे म्हणत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी श्रीनगर येथील हवाई दलाच्या ऐयर बेसला भेट दिली. यावेळी त्यांनी श्रीनगरच्या बदामी बाग कॉंटोमेंटलाही भेट दिली. भारतीय हवाई दलाच्या सैन्यानं पाळलेल्या पाकिस्तानी ड्रोन क्षेपणास्त्रांच्या अवशेषांची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी भारतीय सैन्याचे कौतुक करत संपूर्ण देशाला त्यांच्यावर अभिमान असल्याची प्रतिक्रिया देत भाष्य केलं.