Rajnath singh on Savarkar : महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून सावरकरांनी दया याचिका केली: राजनाथ सिंह
अंदमानच्या कारागृहात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दया याचिका दाखल केली होती. त्या संदर्भात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधींनी सांगितलं म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तत्कालीन इंग्रज राजवटीकडे दया याचिका केली, मात्र सावरकरांना नाहक बदनाम केलं जातंय असं राजनाथ सिंह म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फाळणी टाळली असती, या विषयावर आधारीत पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत पार पडला. या कार्यक्रमात राजनाथ सिंह, सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर मान्यवर सहभागी झाले होते.