Rajiv Gandhi Foundationच्या चिनी फंडिंगची चौकशी; कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाची समिती

भारत-चीन सीमावादानंतर राजीव गांधी फाउंडेशनला 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंग बाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते, आता याप्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबियांचा संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. ईडीचे स्पेशल डायरेक्टर या समितीचे प्रमुख असणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola