Rajasthan Political Crisis | सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी
Continues below advertisement
राजस्थानच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड घडली आहे. काँग्रेसने मोठं पाऊल उचलत सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. पायलट यांच्यासोबतच त्यांच्या समर्थक दोन मंत्र्यांचीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. गोविंद सिंह हे राजस्थान काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील. जयपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.
Continues below advertisement