
Rajasthan Lithium Reserves : राजस्थानमध्ये सापडला पांढऱ्या सोन्याचा साठा
Continues below advertisement
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांसह इतर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांसाठी सर्वात मोठी बातमी हाती येतेय. राजस्थानच्या देगाना नागौर येथे देशाची भरभराट करणारं पांढरं सोनं सापडलंय... या पांढऱ्या सोन्याचं नाव आहे लिथियम... जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने ही आनंदाची बातमी दिलीय. लिथियम हा धातू जगातील सगळ्यात हलका आणि मऊ धातू आहे. लिथियममुळे केमिकल एनर्जीचे रुपांतर इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होते. इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर केला जातो. आणि महत्त्वाचं म्हणजे राजस्थानमध्ये सापडलेलं लिथियम देशाची ८० टक्के मागणी पूर्ण करेल एवढा आहे. दरम्यान, भारताला आता लिथियमसाठी ऑस्ट्रेलिया, चिली आणि चीनवर तुलनेने कमी अवलंबून राहावं लागणारेय.
Continues below advertisement