Raj Thackeray | सेलिब्रिटींना ट्विट करायला लावू नये : राज ठाकरे

शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "मला असं वाटतं आंदोलन जरा जास्तीच चिघळलं आहे. एवढं चिघळण्याची आवश्यकता नव्हती. तुम्ही जसं ऐकता किंवा व्हॉट्सअॅप आणि इतर गोष्टींवर पाहता, तसंच आम्हीदेखील पाहतो. शेतकऱ्यांच्या मागे कोण आहेत?, त्यांना पैसे कुठून येतायेत वगैरे... वगैरे... पण प्रश्न असा आहे की, त्यांच्या मागण्या काय आहेत? सरकारनं जो कायदा आणला आहे, तो कायदा चुकीचा नाही. त्याच काही त्रुटी असू शकतात निश्चित. पण, केंद्राने राज्यांचा विचार करून, राज्यांशी चर्चा करून याची अंमलबजावणी केली पाहिजे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola