राममंदिरासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न वाखाणण्यासारखे, बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे

Continues below advertisement
आज अयोध्येमध्ये राममंदिराचं भूमीपूजन होतं आहे. मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठीची न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
पत्रात राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की, जवळपास 3 दशकांचा संघर्ष, शेकडो कारसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांच्या त्यागानंतर हा दिवस उजाडणार आहे. या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता, असं राज ठाकरे म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram