Piyush Goyal vs Uddhav Thackeray|रेल्वेच्या उपलब्धतेवरुन केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप

Continues below advertisement
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचवण्यासाठी हव्या तितक्या ट्रेन्स केंद्र सरकारकडून मिळत नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं होतं. त्यावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आक्रमक भूमिका घेत, महाराष्ट्रासाठी रोज 125 ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेमंत्र्यांनी यानंतर रात्री सव्वा बारा अडकलेल्या मजुरांची यादी अद्याप मिळाली नसून लवकरात लवकर यादी पाठवावी असं म्हटलं. यानंतर त्यांनी सव्वा दोन वाजता ट्वीट करुन 125 गाड्यांची तयारी केली असताना आम्हाला फक्त 46 ट्रेन्सची यादी मिळाली असून त्यापैकी 41 ट्रेन सोडाव्या लागणार आहेत. कारण उर्वरित पाच ट्रेन पश्चिम बंगाल आणि ओदिशाला जाणाऱ्या असून त्या अम्फान चक्रीवादळामुळे चालवू शकत नाही, असं पियुष गोयल म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram