Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा की अडचण? शिक्षा रद्द करण्यासंदर्भातील याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी
२०१९मध्ये प्रचारावेळी मोदी आडनावावरुन केलेलं वक्तव्य राहुल गांधींना चांगलंच भोवलंय.. याचप्रकरणी राहुल गांधीना सूरत कोर्टाकडून २ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकीही रद्द झाली..आज सुरतच्या न्यायदंडाधिकारी कोर्टाच्या निर्णयाविरोधात सेशन कोर्टात राहुल गांधीनी आव्हान याचिका दाखल केली, आणि त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे... राहुल गांधींना सुनावलेल्या शिक्षेच्या स्थगितीवरील याचिकेवर १३ एप्रिलला सुनावणी होणार आहे तर ३ मे म्हणजे महिन्याभरानंतर राहुल गांधींची शिक्षा रद्द करावी या याचिकेवर सुनावणी होणार...दरम्यान कोर्टात राहुल गांधींनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यापैकी एक याचिका जामीन मिळण्याबाबत होती तर दुसरी याचिका शिक्षेला आव्हान देणारी होती...त्यानुसार ३ मे रोजी होणाऱ्या सुनावणीत जर २ वर्षाची शिक्षा रद्द झाली तरच राहुल गांधीच्या खासदारकीबाबत निर्णय होईल..