Rahul Gandhi : पनौती तिकडे गेला आणि भारत हरला; फायनल मॅचवरून राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई: पीएम मोदी (Narendra Modi) म्हणजे पनौती मोदी आहेत, भारतीय टीम (Team India) चांगलं खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं अशी जळजळीत टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली आहे. ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते.  नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला सहा विकेट्सने हरवलं. पूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करूनसुद्धा अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेला सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, पीए मोदी म्हणजे पनौती मोदी, ते सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला. आपला संघ चांगली कामगिरी करत होता, पण पनौती तिकडे गेले आणि भारतीय संघाला हरवलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola