Congress नेते Rahul Gandhi यांची पत्रकार परिषद, महागाईवरून राहुल गांधींची Modi सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किंमतीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय जीडीपी वाढल्याचे सांगतात. पण जीडीपीचा अर्थ काय आहे? तर जीडीपी म्हणजे जी- गॅस, डी- डिझेल, पी- पेट्रोल यांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ.
राहुल गांधी म्हणाले, 2014 साली नरेंद्र मोदी म्हणाली होती की, पेट्रोल- डिझेलच्या किंमती वाढत आहे. 2014 साली सिलेंडरची किंमत 410 रुपये होती. आज सिलेंडरची किंमत 885 रुपये म्हणजे गॅसच्या किंमतीत 116 टक्के वाढ झाली आहे. पेट्रोल 71.5 रुपये प्रति लीटर होते आज पेट्रोलची किंमत 101 रुपये आहे म्हणजे पेट्रोलच्या किंमतीत 42 टक्के वाढ झाली आहे. डिझेल 57 रुपये लिटर होते आज डिझेलच्या किंमतीत 55 टक्के वाढ झाली आहे . पेट्रोल, डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किंमतीमुळे सामान्या जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रान्सपोर्टेशनच्या किंमतीत देखील वाढ झाली असून त्यामुळे महागाई वाढली आहे.
नोटाबंदीच्या मुद्दयावर देखील राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी म्हणाले, गेल्या सात वर्षात मी फक्त एकीकडे डीमोनेटायझेशन झाल्याचे बघत आहे आणि दुसरीकडे मोनेटायझेशन. आता जनता विचारत आहे की, कोणाचे डीमोनेटायझेशन आणि कोणाचे मोनेटायझेशन झाले आहे.