Rahul Gandhi | काँग्रेसच्या वर्धापन दिनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा परदेश दौरा चर्चेत

Continues below advertisement

 मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतीच राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणाही साधला होता. पण, आता मात्र राहुल गांधी यांच्यावरच भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवल्याचं पाहायला मिळत आहे. यामागचं कारणंही तसंच ठरलं आहे.

(Congress) काँग्रेस, या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा दिवस अतिशय खास समजला जात असतानाच राहुल गांधींची मात्र अनुपस्थिती असेल. पक्षाच्या वर्धापन दिनाच्याच दिवशी राहुल गांधी परदेश दौऱ्यावर गेले असल्याची बाब समोर येत आहे. जे कळताच भाजप नेते गिरीराज सिंह यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram