Rafale Fighter Jet | भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार, राफेल विमानं ताफ्यात सामील होणार!
भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा आज अधिकृतरित्या प्रवेश होणार आहे. एका सोहळ्यात राफेल विमानांचा अंबाला एअर बेसमध्ये समावेश होईल. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील. ही विमानं हवाई दलाच्या सतराव्या स्क्वॉड्रन, 'गोल्डन एअरो'चा भाग असतील. पाच राफेल विमानांची पहिली खेप 27 जुलै रोजी फ्रान्सहून अंबाला इथल्या हवाई दलाच्या एअर बेसवर पोहोचली होती.
Tags :
Multi-religion Prayers Florence Parly Rafale Fighter Aircraft Rafale Fighter Jet Rafale Rajnath Singh PAKISTAN