Rafel Nadal : ब्रिस्बेन स्पर्धेत खेळणार राफेल नदाल, मोठ्या कालावधीनंतर नदाल पुन्हा टेनिस कोर्टवर
Rafel Nadal : ब्रिस्बेन स्पर्धेत खेळणार राफेल नदाल, मोठ्या कालावधीनंतर नदाल पुन्हा टेनिस कोर्टवर
माजी अव्वल टेनिसपटू राफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसणारेय.रविवारपासून सुरू होत असलेल्या ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय स्पर्धेद्वारे दिग्गज नदालचा ताकदवान खेळ पुन्हा एकदा सर्वांना अनुभवता येणार आहे. तर जपानची टेनिस स्टार नाओमी ओसाकाचेही या स्पर्धेद्वारे पुनरागमन होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमची माजी विजेती ओसाका आई बनल्यानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर परतणार आहे. . दुसरीकडे नदालदेखील दुखापतीतून सावरला आहे.