Punjab Congress मधील अंतर्गत कलह शमेना? Navjyotsingh Siddhu यांचं सोनिया गांधींना तीन पानी पत्र
abp majha web team
Updated at:
17 Oct 2021 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला असला तरी पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह शमण्याची चिन्हं नाहीत. कारण नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना तीन पानी पत्र पाठवलंय. या पत्रात सिद्धू यांनी पंजाबमधील 13 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे सोनिया गांधी यांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय. वाळू माफिया, भूमाफिया, दारु माफिया, वाढते वीज दर, ड्रग्ज, बेरोजगारी, गरीबांसाठी कल्याणकारी योजना अशा विविध 13 मुद्द्यांचा पत्रात उल्लेख केलाय.