PSLV C56 : ISRO नं पुन्हा 'करून दाखवलं', सिंगापूरच्या सात उपग्रहांचं श्रीहरिकोटातून प्रक्षेपण

Continues below advertisement

चांद्रयान ३ च्या प्रक्षेपणानंतर इस्रोतर्फे सिंगापूरच्या सात उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटामधील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी साडे सहा वाजता पीएसएलव्ही सी-५६ या रॉकेटच्या सहाय्यानं सात उपग्रहांचं प्रक्षेपण पार पडलं. भारत सरकारच्या एन्सिल या अवकाश कंपनीच्या पुढाकाराने हे व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात आलं. या प्रक्षेपणातून 'डीएस सार' या 'सिंथेटिक अपेर्चर रडार'चा समावेश असलेल्या मुख्य उपग्रहासह सिंगापूरच्या इतर सहा मायक्रो आणि नॅनो उपग्रहांना देखील अंतराळात प्रक्षेपित करण्यात आलं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram