Prof Saibaba : प्रा. साईबाबा प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ABP Majha
प्रा. साईबाबाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमधून काल हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली. हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं... शुक्रवारीच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने साईबाबा आणि इतर पाच जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यांना अपील करण्यास परवानगी देण्यात आली, तसेच २०१७ मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली इथल्या सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा रद्द केली. मे २०१४ मध्ये माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली साईबाबा यांना अटक करण्यात आली होती.