प्रेशर कुकर बॉम्ब, स्फोटकांचा साठा जप्त, लखनऊमध्ये संशयित दहशतवादी अलकायदा संघटनेशी संबंधित
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दोन दहशतवाद्यांच्या एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही दहशतवादी अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, दोघे पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात होते. घटनास्थळी एटीएसकडून शोध मोहीम सुरु आहे. या व्यतिरिक्त स्थानिक पोलिसही या कारवाईत सामील झाले आहेत. जवळपासची घरे रिकामी केली गेली आहेत. बॉम्ब पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, लखनऊमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.