Prashant Kishor | पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा देखील पार करता येणार नाही : प्रशांत किशोर

Continues below advertisement

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपची जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे भाजपने निवडणुकीची आक्रमक तयारी केली असतानाच, रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दावा केला आहे की, "पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठी संघर्ष करावा लागेल." म्हणजेच भाजपला तिहेरी आकडा गाठता येणार नाही, असं ते म्हणाले.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सहयोगी म्हणून काम करणारे प्रशांत किशोर यांनी यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "मीडियातील काही चॅनल्सनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार केला आहे. पण सत्य हे आहे की पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा पार करण्यासाठीच संघर्ष करावा लागेल. प्रशांत किशोर एवढ्यावरच थांबले नाहीत. त्याने आपलं ट्वीट सेव्ह करण्याचं आवाहन करत म्हटलं की "जर भाजपची कामगिरी यापेक्षा चांगली झाली तर रणनीतीकाराचं काम सोडेन."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram