Congress : प्रशांत किशोर यांनी सोनिया-राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल संध्याकाळी काँग्रेसच्या हंगामी अध्य़क्षा सोनिया गांधी, नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची भेट घेतल्य़ाचं कळतंय. 2024 च्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात ही भेट झाल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे2024 ला भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याच्या प्रयत्नांना प्रशांत किशोेर यांचाही हातभार लागत असल्याची चर्चा रंगतेय.