Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

Continues below advertisement

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन राज्यसभेवर आल्यानंतर त्यांच्या होम पीचवर म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या बांकीपूर विधानसभा (Bankipur By-election) मतदारसंघात प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या जनसुराज पक्षाने जोरदार लढत दिली. भाजप अध्यक्षांच्या हायप्रोफाईल मतदारसंघात जेन झी गेमचेंजर ठरला. बांकीपूरमध्ये जनसुराज्य पक्षाचे प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय झाला. गेल्या वर्षी झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांचा विजय म्हणजे भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का मानला जात आहे. 

भाजपच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच प्रशांत किशोर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी हा विजय केवळ स्वतःचा नसून बिहारमधील बदलाची अपेक्षा बाळगणाऱ्या जनतेचा असल्याचे म्हटले. भाजपचा तब्बल तीन दशकांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बँकिपूर मतदारसंघात विजय मिळवत त्यांनी पहिल्यांदाच विधानसभेत प्रवेश केला. हा जन सुराज पक्षाचा पहिला विधानसभा विजय असून बिहारच्या राजकारणात तो महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola