Pranab Mukherjee : माफानाम्यानं त्याग,देशभक्ती कमी होत नाही;Savarkar यांच्याबद्दल प्रणवदांचं मत समोर
Continues below advertisement
दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलीनं त्यांच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल प्रणवदांचं मत जगासमोर आलं आहे. सावरकरांनी इंग्रजांना माफीनामे लिहिले म्हणून त्यांची देशभक्ती आणि त्याग कमी होत नाही, सेल्युलर जेलमध्ये सावरकर बंधूंनी काय अत्याचार भोगले, हे कुणी कसं विसरू शकतं, अशा शब्दांत प्रणव मुखर्जी यांनी सावरकरांबद्दलचं मत त्यांच्या खासगी डायरीत नोंदवून ठेवलं होतं. सावकरांबद्दल गांधी घराण्याचं मत त्यांना अजिबात मान्य नव्हतं, सावरकरांवर वारंवार टीका करण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागेल, असंही त्यांनी लिहून ठेवलं होतं. प्रणब माय फादर या पुस्तकात त्यांच्या मुलीनं ही सगळी माहिती जगासमोर ठेवली आहे.
Continues below advertisement