PM Security Lapse : पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की मी भटिंडा विमानतळावर जीवंत पोहोचू शकलो..... हे शब्द आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे. पंजाबमधील कालच्या दौऱ्यात पंतप्रधानांना सुरक्षेतील त्रुटींमुळे दौरा सोडून परतावं लागलं. तेव्हा  पुन्हा दिल्लीकडे निघालेल्या मोदींनी विमानतळावर पंजाबच्या अधिकाऱ्यांकडे पाहून हे वक्तव्य केल्याचं एएनआय वृत्तसंस्थेनं म्हटलंय. पंतप्रधानांच्या सुरक्षेवरून  मग भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप रंगले. पंतप्रधानांच्या फिरोजपूर दौऱ्याच्या आधी शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हवामान खराब असल्यानं पंतप्रधानांनी रस्त्यानं सभास्थळी जायचं ठरवलं. पण एका उड्डाणपुलावर त्यांचा ताफा तब्बल २० मिनिटं अडकून पडला. सभास्थळी न जाता तिथूनच पंतप्रधान परतले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आणि पुढे राजकीय घमासान रंगलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola