PM Modi Srinagar :एकाग्रता मनाची शांति म्हणत काश्मिर खोऱ्यातून मोदींनी दिल्या योग दिनाच्या शुभेच्छा
PM Modi Srinagar :एकाग्रता मनाची शांति म्हणत काश्मिर खोऱ्यातून मोदींनी दिल्या योग दिनाच्या शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या (America) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींचा 24 जूनपर्यंत अमेरिका दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान बुधवारी (21 जून) न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये अनेक कार्यक्रम आखण्यात आले आहेत. UN च्या मुख्यालयात 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी नेतृत्व करतील. यासह पंतप्रधान मोदी आज खालील कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत. "मी माझ्या दौऱ्याची सुरुवात न्यूयॉर्कपासून करेन, जिथे मी UN मुख्यालयात 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी UN नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सदस्यांमध्ये सहभागी होईल," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर पुढे, भारताच्या डिसेंबर 2014 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता देण्याच्या ठरावाच्या समर्थनार्थ या विशेष कार्यक्रमाबद्दल उत्साहित असल्याचंही मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून आंतरराष्ट्रीय योग दिन वार्षिक कार्यक्रम म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या दिवसाच्या ऐतिहासिक कार्यक्रमात 9 वर्षांनंतर प्रथमच ते संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग सत्राचे नेतृत्व करणार आहेत.