PM Narendra Modi SUPER EXCLUSIVE : जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, मोदींची मुलाखत

आपण जिवंत असेपर्यंत ओबीसी, एससी आणि एसटी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, तसंच धर्माच्या आधारे आरक्षण लागू होऊ देणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Exclusive Interview On ABP)  म्हणाले. ईडीच्या कारवाईत बाहेर येत असलेला पैसा निर्दोष लोकांचा आहे का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला. पंतप्रधान मोदींचा शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये रोड शो झाला. यावेळी पंतप्रधान मोदींशी एबीपी नेटवर्कच्या प्रतिनिधी मनोज्ञा लोईवाल यांनी सुपर एक्स्लुझिव्ह संवाद साधलाय. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, भाषा आणि संस्कृती वेगवेगळी असली तरी  असा जोश आणि उत्साह फार कमी वेळा पाहिला गेला आहे. यावेळी ओडिशातील लोकांमध्ये खूप उत्साह आणि चमक आहे. भाषेची समस्या असूनही ओडिशातील लोकांशी हृदयाचे कनेक्शन आहे, ओडिशासाठी हा एक टर्निंग पॉइंट असून या ठिकाणी भाजपची सत्ता येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola