PM Narendra Modi Speech : भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलणार ABP Majha
PM Narendra Modi Speech : आज भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजवंदन केलं. यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी म्हटलं की, भारतातच नाही तर जगभरात कानाकोपऱ्यात भारतीयांनी राष्ट्रध्वज फडकवत त्याचा मान वाढवला आहे. संपूर्ण जगभरात भारताचा राष्ट्रध्वज अभिमानानं फडकतोय. जगभरात पसरलेल्या सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.