PM Modi Speech Highlights : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
जगभरात निर्माण झालेल्या लसींपैकी सर्वात स्वस्त लस भारताची आहे. तसेच जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम देखील भारतात सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश संकटात आहे, आपण संयम पाळला पाहिजे, या संकटातून बाहेर आलं पाहिजे. कोरोनात जीव गमावलेल्या सर्वांना श्रद्धांजली, कठीण काळातही धीर सोडू नका. देशभरात सध्या ऑक्सिजन मागणी वाढली आहे. भारताकडे प्रचंड मोठी फार्मा इंडस्ट्री आहे. औषधांचं उत्पादन वाढवण्यास संपूर्ण सहकार्य केलं जातयं. भारताने जगातील सर्वात स्वस्त लस तयार केली आहे. असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला दिला.