PM Narendra Modi Speech : Constitution Day : घराणेशाही लोकशाहीसाठी घातक : नरेंद्र मोदी ABP Majha

Continues below advertisement

नवी दिल्ली : राजकीय पक्षातील घराणेशाही लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे, असं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका पक्षाची सूत्रं पिढ्यानपिढ्या एकाच घराण्याच्या हातात राहणं लोकशाहीच्या विरोधात आहे. ज्यांनी लोकशाही मूल्य गमावलं आहे ते लोकशाहीचं संरक्षण कसं करु शकतील? असा सवाल करत मोदींनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणाही साधला. संविधान दिनाच्या निमित्ताने संसदेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत एका अशा संकटाकडे जात आहे जो संविधानाशी समर्पित असलेल्या लोकांसाठी चिंतेचा विषय आहे. आपल्या चांगल्या गुणांच्या आधारे एका परिवारातून अनेक लोकं राजकारणात येत असतील तर ती घराणेशाही नसते, असंही ते म्हणाले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram