PM on The Kashmir Files : चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न झाला
abp majha web team
Updated at:
15 Mar 2022 03:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM on The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्वजण कौतुक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) नुकतीच चित्रपटाच्या टीमचीही भेट घेतली होती. आता, मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरही चर्चा केली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘चित्रपटात जे दाखवलंय, ते सत्य नेहमीच दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’