PM Modi | 5 एप्रिलला रात्री 9 वाजता वीज बंद करुन घरात दिवा, मेणबत्ती, टॉर्च लावा : पंतप्रधान मोदी

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक व्हिडीओ संदेश प्रसारित केला. कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी 5 एप्रिल, रविवारी घरात बसून दिव्यांचा झगमगाट करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी केलं.  यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 5 एप्रिल, रविवारी रात्री 9 वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola