Mann ki Baat | पुणे-मुंबईतील 'या' शेतकरी समुहाच्या आठवडी बाजाराचं कौतुक; नरेंद्र मोदी यांचं भाषण

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बातमध्ये शेतकरी आणि शेतपूरक व्यवसायांवर बोलताना पुणे आणि मुंबईत एका शेतकरी समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या आठवडे बाजाराचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 3-4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फळे आणि भाज्यांना एपीएमसी कायद्याच्या परिघातून मुक्त करण्यात आले. यामुळे महाराष्ट्रातील फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कसा बदल झाला, याचे उदाहरण आहे श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. हा शेतकऱ्यांचा समूह आहे. पुणे-मुंबईमध्ये शेतकरी स्वतः आठवडी बाजार भरवतात. या बाजारांमध्ये सुमारे 70 गावांमधील 4,500 शेतकऱ्यांच्या उत्पादनांची थेट विक्री केली जाते. अडते नाहीत. ग्रामीण युवक या बाजारामध्ये खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी होतात. रोजगार मिळवतात, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात' रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. आज 27 सप्टेंबर रोजी देखील त्यांनी 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram