New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नव्या संसद इमारतीचं भूमीपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा भूमीपूजन केलं. त्यानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली. या समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्र प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री हरदीप सिंह पूरी आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह सहभागी झाले होते. केंद्री कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्यांसहीत जवळपास 200 नेते लाईव्ह वेबकास्टमार्फत भूमीपूजन सोहळ्यासाठी हजर होते.
ऑक्टोबर 2022 पर्यंत नवी संसद इमारत तयार करण्याचं मोदी सरकारचं ध्येय आहे. जेणेकरुन देशाचा 75वा स्वातंत्र्य दिवसाचं आजोयन या संसद इमारतीमध्ये करण्यात येईल. ही इमारत पुढिल 100 वर्षांची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात येणार आहे.
Continues below advertisement