PM Modi यांच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ, पंतप्रधान म्हणाले...
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्वच्छ भारत अभियानाचा दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. कचरामुक्त शहर आणि शुद्ध पाणी देण्याचं लक्ष्य असल्यांचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तर अटल मिशनच्या दुसऱ्या टप्प्यालाही सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'स्वच्छ भारत मिशन शहरी 2.0' आणि 'अमृत 2.0'चा शुभारंभ करण्यात आला आहे. या दरम्यान बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 मध्ये देशवासियांनी भारताला हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला होता. 10 कोटींहून अधिक शौचालयं तयार करण्यासोबतच देशवासियांनी हा संकल्प पूर्ण केला. आता 'स्वच्छ भारत मिशन-अर्बन 2.0'चं लक्ष्य गार्बेज फ्री शहर, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून पूर्णपणे मुक्त शहर तयार करणं आहे.
Continues below advertisement