CSIR Society : आपल्या वैज्ञानिकांनी वर्षभरात 'मेड इन इंडिया' कोरोना लस बनवली : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीएसआयआर सोसायटीच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी संबोधित करताना ते म्हणाले की, कोरोना महामारी हे जगासमोर या शतकातील सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. पण इतिहास साक्षीदार आहे की, जेव्हा मनुष्यजातीवर मोठं संकट आलं तेव्हा विज्ञानाने उत्तम भविष्याचे मार्ग खुले केले आहेत. आज आपल्या देशाचे वैज्ञानिक इतर देशांच्या वैज्ञानिकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. तेवढ्याच वेगाने काम करत आहेत. आपल्या वैज्ञानिकांनी एका वर्षात मेड इन इंडिया कोरोना लस बनवली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola